कोणाला स्वतःबद्दलची टीका आवडते का? बरं, या जगात कोणालाही स्वतःवर केलेली टीका आवडत नाही. अनेकदा टीका हाताळणे कठीण असते. आपल्या घरात, ऑफिसमध्ये आणि समाजात आपल्या आजूबाजूला अनेक टीकाकार असतात. टीका ही एखाद्यातील चांगले-वाईट पैलूशोधण्यासाठीचा किंवा मूल्यमापन करण्याचा मार्गआहे. टीका ही लाजिरवाणी गोष्ट वाटू शकते. परंतु कामाची पद्धत सुधारण्याची ही एक संधी असू शकते. टीका ही केवळ दोष शोधण्यासाठी नाही, तर ती एक चूक सुधारण्याची प्रक्रिया असू शकते. आपण जाणून घेऊ या, ‘टीका वैयक्तिकरित्या कशी हाताळावी आणि त्यास कसे तोंड द्यावे?'
ॲरिस्टोटल - टीका ही अशी गोष्ट आहे जी
आपण काहीही न बोलता, काहीही न करता आणि काहीही नसण्याद्वारे सहजासहजी टाळू
शकतो."
टीका हाताळण्याचे दोन सोपे मार्ग आहेत: एकतर
कोणीही टीकेचा सकारात्मक पद्धतीने उपयोग करून सुधारणा करणे किंवा नकारात्मक
पद्धतीने त्याचा सामना करणे, ज्यामुळे आत्मसन्मान ठेच पोहचून तणाव आणि क्रोध निर्माण
होऊ शकतो. टीकेचे सर्वात सामान्य प्रकार म्हणजे विधायक आणि विध्वंसक. एखाद्याची
प्रतिष्ठा, नावलौकिक, आणि स्वाभिमान नष्ट
करण्याच्या हेतूने विध्वंसक टीका केली जाते. विधायक टीका म्हणजे तुमच्या चुका
दाखवणे आणि तुम्ही कोठे सुधारणा करू शकता हे दाखवणे. कोणत्याही प्रकारची टीका असेल
तरी, लक्षात ठेवा की त्याचा उपयोग अजूनही तुमच्या फायद्यासाठी होऊ शकतो.
जेव्हा तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात टीकेला सामोरे जाता तेव्हा खालील मुद्दे लक्षात ठेवा:
1. बचावात्मक पवित्रा घेणे टाळा:
जेव्हा आपण टीकेला सामोरे जातो तेव्हा अनेकांची पहिली प्रतिक्रिया म्हणजे बचावात्मक पवित्रा घेणे आणि आपल्या भूमिकेचे समर्थन करण्याचा प्रयत्न करणे. जे सांगितले जात आहे ते सक्रियपणे ऐका आणि ते समजून घ्या. अनेकदा लोक ऐकण्याऐवजी त्यांच्या टीकेच्या प्रतिसादा बद्दलचा किंवा द्यायच्या खुलाश्याचा विचार करत असतात. टीकाकारांचे हेतू प्रामाणिक आहेत असे गृहीत धरा. त्यांचे अभिप्राय मान्य करा आणि ते दिल्याबद्दल लोकांचे आभार माना. टीकेकडे खुल्या मनाने बघावे. सबबी देणे टाळावे.
2. टीका वैयक्तिकरित्या घेऊ नका
एक व्यक्ती म्हणून तुमच्यावर टीका केली जात नाही, तर ते तुमच्या कामाबद्दल किंवा कामाच्या पद्धतींबद्दल असते. त्यामुळे ताबडतोब निष्कर्ष काढू नका आणि ती वैयक्तिकरित्या घेऊ नका. कधीकधी टीका फक्त त्या व्यक्तीबद्दल नव्हे तर ती अभिमान आणि मत्सर यासारख्या भावनांबद्दल असते. तुमच्यावर टीका करणारी व्यक्ती जाणूनबुजून तुम्हाला खाली आणण्याचा किंवा तुम्हाला चिथावण्याचा प्रयत्न करत आहे असे गृहीत धरू नका. टीका ही परिस्थितीजन्य असते आणि तुमच्या कामाशी संबंधित असते, त्या व्यक्तीबद्दल नसते.
3. टीकेबद्दल चौकशी करा
अभिप्राय
देणाऱ्या व्यक्तीच्या हेतूंकडे लक्ष द्या. अधिक चौकशी करा आणि त्याचा उद्देश जाणून
घ्या. जर एखाद्यावर औचित्य साधून टीका केली जात असेल तर ते खोट्या टीकेचे लक्षण
आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे उत्तम. अशा परिस्थितीत गप्प राहणे आणि आदरणीय गौरव प्रतिष्ठा टिकवून ठेवणे उत्तम. सुधारणेच्या
उद्देशाने टीका असल्यास, गरज पडल्यास अधिक प्रश्न विचारा.
4) 4. टीकेतून तुम्ही नवीन काय शिकू शकता ते जाणून घ्या
टीका
नकारात्मक वाटत असली तरी यामुळे शिकण्याची आणि सुधारण्याची संधी मिळते. कल्पना
करा, जर एखाद्याची सतत प्रशंसा होत असेल आणि त्याच्यावर कधीही टीका होत नसेल तर ती
व्यक्ती कशी प्रगती करू शकते. त्यामुळे टीका हा आपल्या प्रगतीचा आणि विकासाचा
महत्त्वाचा भाग आहे. जर एखाद्याला खरोखरच जीवनात सुधारणा करायची असेल तर त्याने
विधायक टीकेला आमंत्रण दिले पाहिजे आणि त्याचे कौतुक केले पाहिजे.
टीका
हाताळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे थोडे थांबणे आणि मन शांत करणे. टीकेवर
प्रक्रिया करण्यासाठी संयम आणि शांतता आवश्यक आहे. मनात राग आणि तीव्र प्रतिक्रिया
येत असेल तर भूतकाळातही अशीच वेळ आली होती की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न
करा. या प्रकरणाच्या मूळ कारणाकडे जा. आंतरिक मनाशी प्रामाणिकपणे संवाद साधा
ज्यामुळे आपण अजून नम्र आणि खंबीर बनतो.
6) 6. हसत राहा
हसण्यामुळे
अधिक आराम मिळतो. हसण्यामुळे सकारात्मक चैतन्य निर्माण होते आणि परिस्थितीत
सामान्यता येते. हसण्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्यांचा दृष्टिकोन सोपा आणि मवाळ
करण्याची प्रेरणा मिळेल.
टीका यशस्वीपणे हाताळण्याची गुरुकिल्ली
म्हणजे टीकेचा हेतू ठरवणे, टीकेला शांतपणे
प्रतिसाद देणे, त्याला विधायक पद्धतीने अवलंबणे आणि तुमचे नुकसान करण्यासाठी
विनाकारण टीका करणाऱ्या लोकांपासून दूर राहणे.
प्रो. अतुल फेगडे
To read this article in English click here: https://profatulfegade.wordpress.com/2020/08/29/6-ways-of-handling-criticism-at-work/
References:
- Basu Sreeradha, 5 ways to deal with criticism at work, ET Bureau, 25/06/2019, https://economictimes.indiatimes.com/jobs/5-ways-to-to-deal-with-criticism-at-work/articleshow/69936292.cms accessed on 29/8/2020 at 4.47pm
- Castrillon Caroline, 5 Healthy ways to deal with criticism at work, 19/01/2019, https://www.forbes.com/sites/carolinecastrillon/2020/01/19/5-healthy-ways-to-deal-with-criticism-at-work/#bad2d36312a4 accessed on 29/8/2020, 4.30pm
- Greatist, How to handle criticism like a Pro, 11/6/2015, https://greatist.com/happiness/how-handle-criticism-pro#tl-dr, accessed on 29/8/2020 at 5.22pm
- Pettinger Tejvan, 7 effective ways to deal with criticism, https://www.lifehack.org/articles/featured/7-effective-ways-to-deal-with-criticism.html accessed on 29/8/2020, at 4.45pm
- Stahl Ashley, Five ways to bounce back from criticism at work, 30/05/2016, https://www.forbes.com/sites/ashleystahl/2016/05/30/five-ways-to-bounce-back-from-criticism-at-work/#66e5b858be12 accessed on 29/8/2020 at 5.10pm





















