विजय एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो. तो म्हणतो, "मी कंपनीत माझ्या आयुष्यातला मोठा काळ घालवला आहे आणि खूप मेहनत केलेली आहे. खूप समर्पित भावनेने काम केलेले आहे. मी अनेक नवे उपक्रम हाती घेतल्याने कंपनीचा बराच विकास झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक नवीन लोक या कंपनीत कामासाठी सामील झाले आहेत आणि नव्या पद्धतीने काम करू लागले आहेत. त्यांची काम करण्याची शैली बरीच वेगळी आहे. काही ग्राहक त्यांच्या कामाच्या पद्धतीवर खूष नसतात. जेव्हा मी त्यांना याबद्दल विचारलं तेव्हा ते माझं ऐकत नाहीत आणि अनेकदा कामाच्या जुन्या पद्धतींवर टीका करतात. मी त्यांना किंवा त्यांच्या कामाच्या पद्धतीला सहन करू शकत नाही. माझ्यासाठी हा अतिशय वेदनादायक अनुभव आहे.” हे उदाहरण विजयच्या अस्वस्थतेवर प्रकाश टाकते. बहुधा विजय कंपनीशी आणि त्याच्या कामाशी असलेल्या भावनिक निकटतेमुळे असावा. आपल्यापैकी अनेकजण विजयसारखे काम करतात आणि जेव्हा आपल्याला दुस-या व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही तेव्हा ते अस्वस्थ होतात. जेवढी निकटता जास्त तितक्या जास्त अपेक्षा असतात. मग जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा निराश येण्याची शक्यता अधिक असते.
भावनिक निकटता म्हणजे जेव्हा आपण लोकांशी,
श्रद्धा, सवयी, वस्तू, मालमत्ता आणि परिस्थिती इत्यादींशी घट्ट जोडले
जातो. भावनिक निकटतेमुळे व्यक्ती स्वातंत्र्य गमावते. जर आपण एखादी गोष्ट गमावली
तर आपल्याला दुःख होते आणि आपल्याला वाईट वाटते. अनेकदा गोष्टींशी निकटता असल्याने
अपेक्षित परिणामांबद्दल अपेक्षा निर्माण होतात. बहुतेक भावनिक निकटता नियंत्रणाशी
संबंधित असतात. जेव्हा तुम्ही गोष्टींवर किंवा इतर लोकांवर नियंत्रण ठेवण्याची
तुमची इच्छा सोडून देतात, तेव्हा ते सर्वांना मोकळे करते.
तेथील आपली निराशा कमी करण्यासाठी अलिप्ततेचा सराव करणे गरजेचे आहे. अनेकदा आपल्या जीवनात आपण वेगवेगळ्या गोष्टींपासून
भावनिकदृष्ट्या अलिप्त असणे गरजेचे असते. अनेकदा भावनिक निकटतेतून बाहेर
येण्यासाठी निरोगी अलिप्ततेची गरज असते. एकदा का आपण अपेक्षित परिणामांपासून किंवा
अपेक्षांपासून स्वतःला वेगळे केले की आपण त्याची चिंता करण्याचे थांबवू शकतो.
अलिप्ततेची व्याख्या "वस्तुनिष्ठ किंवा
अलिप्त असण्याची स्थिती" (ऑक्सफर्ड डिक्शनरी) अशी करण्यात आली आहे. सोप्या
शब्दांत, अलिप्ततेचे वर्णन, ‘गोष्टी सोडून देण्याची
प्रक्रिया असे केले जाते’. अलिप्तता म्हणजे गोष्टी टाळणे किंवा
गोष्टींपासून वेगळे होणे नव्हे. आपल्याला हवं तसं सगळं सतत घडत नाही, पण आपण येणार
कोणताही निकाल सकारार्थी स्वीकारला पाहिजे. अलिप्तता म्हणजे तुम्ही
नेहमीच बरोबर असणार नाही हे शिकणे. रागावून किंवा त्यासाठी दुस-या कुणाला दोष देऊन
आपण अलिप्त राहू नये. अलिप्तता म्हणजे स्वत:चे आणि इतराचे अधिक चांगल्या प्रकारे
निरीक्षण करणे. अनेकदा स्वतःला गोष्टींपासून वेगळे करण्यासाठी ध्यान धारणा केली
जाऊ शकते.
विजयच्या उदाहरणात, विजय कंपनीचा राजीनामा देतो किंवा संस्थेशी समर्पित भावनेने काम करणे थांबवतो ती अलिप्तता नसते. निरोगी अलिप्तता म्हणजे समोरच्या लोकांवरचे नियंत्रण सोडणे. कंपनीतील इतर लोकांनी त्याला हवे तसे काम केले पाहिजे, असा विचार विजयने थांबवला पाहिजे. उलट त्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की नवे लोक वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. कधीकधी चालक होणे सोडून प्रवासी होणे चांगले. यामुळे प्रवासाचा आनंद लुटायला मिळेल. विजयने स्वतःचे विचार इतरांवर जबरदस्ती लादू नये. त्याने लोकांना आपापल्या पद्धतीने प्रयत्न करण्याची परवानगी दिली पाहिजे. जर इतर लोकांनी चुका केल्या आणि अपयशी ठरले तर ते त्यातून शिकतील आणि अधिक सुधारणा करू शकतील. ते कंपनीसाठी चांगलं आहे.
त्याऐवजी विजय अलिप्ततेच्या फायद्यांवर लक्ष
केंद्रित करू शकतो. कंपनीचा विकास आणि समृद्धी व्हावी अशी सगळ्यांची इच्छा असते.
नवीन विचार ऐकून आणि नव्या संकल्पनांशी जुळवून घेऊन कंपनी उत्कृष्ट कामगिरी करू
शकते. विजयला शिकण्याची आणि सुधारण्याची ही एक संधी आहे.
जर विजयने नवीन लोकांबद्दलची नकारात्मकता
आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दलची नकारात्मकता दूर केली तर तो स्वतःला
निरोगीपणे अलिप्त करू शकतो.
आपल्या दैनंदिन जीवनातही आपल्यापैकी अनेक जण
इतरांच्या जीवनात हस्तक्षेप करत राहतात. विचारले नसतानाही इतरांना मोफत सूचना देतात.
कधी कधी आपण आपली विचार करण्याची पद्धत इतरांवरती लादतो आणि त्यामुळे
काही समस्या निर्माण होऊ शकतात.
आपण स्वतःला काम, लोक, वस्तू आणि
विचारांपासून निरोगी पद्धतीने वेगळे करायला शिकले पाहिजे.
(जर तुम्हाला हा लेख आवडत असेल तर कृपया शेअर करा आणि तुमच्या मौल्यवान टिप्पणी द्या)
डॉ. अतुल फेगडे
To read this article in English click here: https://profatulfegade.wordpress.com/2020/10/25/detachment/



















