कम्फर्ट झोन
म्हणजे काय?
जाणूनबुजून
किंवा नकळत आपण आपल्या आजूबाजूला अनेक कम्फर्ट झोन तयार केले असतात.
उदाहरणार्थ, एखाद्याला आपल्या आवडत्या खुर्चीत बसून आणि आवडत्या मगमध्ये कॉफी प्यायला आवडतं. मग किंवा खुर्ची बदलली तरी कॉफीची चव
बदलणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात आपण अशा प्रकारच्या सवयी लावून घेतलेल्या आहेत आणि त्यातूनच कम्फर्ट झोन तयार होत
असतात.
कम्फर्ट झोन ही एक अशी मानसिक अवस्था आहे जिथे आपल्याला गोष्टी परिचित आहेत असे वाटते आणि आपण सभोवतालावर नियंत्रण ठेवू शकतो अशी भावना असते. ह्यात आपण चिंता आणि तणाव कमी अनुभवतो. कम्फर्ट झोनमध्ये स्थिर कामगिरी शक्य आहे. कम्फर्ट झोन, सर्वोत्तम कामगिरीची झोन आणि डेंजर झोन अशी तीन मानसिक अवस्था असतात. खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे, आपण कम्फर्ट झोनमध्ये आरामात असतो. निळ्या रंगाने दर्शविलेला कम्फर्ट झोन तणावमुक्त क्षेत्र आहे जो आपल्याला चांगल्या प्रकारे परिचित असतो. सर्वोत्तम कामगिरीच्या झोन मध्ये (हिरव्या रंगाने दर्शविलेले) काही प्रमाणात तणाव निर्माण करून कार्यक्षमता सुधारली जाते. पिवळ्या रंगाने दर्शविलेला डेंजर झोन म्हणजे जेव्हा चिंतेची पातळी जास्त असते. आणि तेव्हा कार्यक्षमता कमी असते.
खरी समस्या
ही आहे की आपण कोणत्या झोनमध्ये आहोत हे आपण ओळखू शकत नाही. अनेकदा आपला कम्फर्ट झोन
कधी सोडावा आणि त्यात केव्हा राहावे हे आपल्याला कळत नाही.
आपल्या
कम्फर्ट झोनमध्ये आपल्याला नेहमी सुरक्षित वाटते आणि अनेकदा आपल्याला या बाहेर
आल्यावर तणावाचा
सामना करावा लागतो. आपल्या सर्वांना कम्फर्ट झोनमध्ये राहण्याची तीव्र मानसिक
इच्छा असते. आपल्याला नुकसानीचा सामना करावा लागला तरी आपण कम्फर्ट झोनला चिकटून
राहतो. आपण अनेकदा प्रवासात अज्ञात रस्ता टाळतो आणि ज्ञात रस्त्यांवर चिकटून राहतो
आणि त्यामुळे इच्छित स्थळी पोहोचायला वेळ लागतो.
आपण आपला कम्फर्ट झोन का सोडला पाहिजे?
- धोका न पत्करता तुम्ही आयुष्यात अधिक साध्य करू शकत नाही: प्रत्येकाला सुरक्षित आणि आरामदायी झोनमध्ये राहायला आवडतं. जोखीम पत्करून आपण आपल्या अमर्याद क्षमता शोधू शकतो. जर आपण जोखीम घेतली नाही तर जीवनात आपण कोण आहोत आणि काय करू शकतो हे कदाचित आपल्याला कधीच समजू शकणार नाही. जेव्हा आपण स्वतःबद्दल जाणून घेऊ तेव्हा आपल्याला जे हवं ते आपण साध्य करू शकतो.
- कम्फर्ट झोनमध्ये ‘वाढणे’ आणि ‘शिकणे’ कठीण आहे: सहसा अनोळखी रस्ता निवडा. जर तुम्ही त्याच पद्धतीने काम करत राहिलात तर तुम्हाला नव्या गोष्टी अनुभवता येणार नाहीत.
- आयुष्यात थोड्यावर थांबू नका: कम्फर्ट झोन मधून आपण बाहेर पडून, आपण बरंच काही साध्य करू शकतो, पण आपण त्यापेक्षा कमी वर स्थिरावतो. कम्फर्ट झोन सुरक्षिततेची भावना देतो आणि आपल्याला आहे त्या बाबतीत समाधानी बनवते.
- गर्दीत हरवून जाणे : कम्फर्ट झोनमध्ये शिकण्याची, वाढण्याची, नेटवर्किंग आणि जोखीम घेण्याची क्षमता हरवून जाते. जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतो तेव्हा काहीतरी नवीन करण्याचा सगळा उत्साह आणि आत्मविश्वास हरवून जातो आणि अनेकदा आपण कळपाच्या मानसिकतेचा भाग बनतो.
- स्वतःवर थोडासा दबाव आणल्याने तुमची उत्पादकता वाढते: जेव्हा आपण कम्फर्ट झोनमध्ये असतो तेव्हा सर्व काही योजनेनुसार घडत असते. तुम्ही कमी तणावामध्ये राहून खूष असता आणि तुम्ही आयुष्यात टिकून राहता. तुमच्या आयुष्यात स्थिर कामगिरी असते. जेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काम करता तेव्हा थोडासा दबाव आणून तुमची एकाग्रता, सर्जनशीलता, स्मरणशक्ती आणि क्षमता वाढवू शकता.
पुढील लेखात
आपण कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याच्या मार्गांचा शोध घेणार आहोत.
प्रा. अतुल फेगडे
To read this article in English click here: https://profatulfegade.wordpress.com/2020/09/12/why-do-we-like-to-stay-in-comfort-zone/
संदर्भ:
- Harper Tiffany, Here Is Everything You Need to Know About Your Comfort Zone, 10/11/2018, https://addicted2success.com/life/here-is-everything-you-need-to-know-about-your-comfort-zone/ accessed on 12/9/2020 at 2.30pm
- Harmon Justin, 6 Reasons Why Your Comfort Zone Is Holding You Back In Life, 27/7/2020, https://www.lifehack.org/articles/communication/6-reasons-why-your-comfort-zone-holding-you-back-life.html accessed on 12/9/2020 at 3.41pm
- Team Aspery, Reasons to Get Out of Your Comfort Zone (And 10 Things You Can Do Right Now), https://blog.daveasprey.com/step-outside-your-comfort-zone/ accessed on 12/9/2020 at 4.15pm










