Saturday, September 5, 2020

शिक्षकांची नोकरी अतिशय सोपी असते


होय, तुम्ही हे अनेकदा ऐकलं आहे. शिक्षकांचं काम अतिशय सहज आणि सोपं आहे. शिक्षकाला फक्त वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. बस्स एवढंच. अध्यापन हे एक ठराविक वेळेच काम आहे. विद्यार्थ्यांच्या मते शिक्षक वर्गात येतात, तासभर बोलतात, आशय देतात, कधी कधी प्रश्न विचारतात आणि परत जातात. आणि आजकाल शिक्षक घरीच असतात आणि घरातून शिकवत असतात. त्यामुळे हे खूप आरामदायी काम आहे. पण ते काम खरंच इतकं सोपं आहे का? आजच्या तारखेला आपण शिक्षकी पेशाच्या साधेपणाचा वेध घेऊ या.

शिक्षकांचे काम प्रामुख्याने वर्गातच दिसते, पण वर्गापूर्वी शिक्षकांना काही गृहपाठही करायचा असतो. जय्यत तयारी केल्याशिवाय तुम्ही वर्गात जाऊ शकत नाही. तासाभराचे सत्र घेण्यासाठी, अनेकदा ३ ते ४ तास तयारीसाठी वेळ लागतो. हे काम केवळ वर्गापुरते मर्यादित नाही, तर अनेकदा ते काम घरीही करावे लागते. एक गृहपाठ ही देण्यासाठी बराच वेळ तयारी करावी लागते. त्या गृहपाठांचे मूल्यमापन करण्यासाठी शिक्षकांना ते वाचावे लागते आणि मग त्याचे मूल्यमापन करावे लागते. वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता ही प्रक्रिया वेळखाऊ असते आणि त्यासाठी तासन्तास मेहनत घ्यावी लागते. प्रत्येक शिक्षकाचे आपल्या विषयावर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. महाविद्यालयातील एका वरिष्ठ प्राध्यापकाचे उदाहरण म्हणून, जेव्हा तो एखादा  विषय शिकवायला घेतो, तेव्हा त्याला अध्यापन आराखडा तयार करणे, वैयक्तिक सत्रांचे नियोजन करणे, विषयांच्या नोट्स तयार करणे, मूल्यमापनाचे नियोजन करणे इ. गोष्टी कराव्या लागतात. हे सगळं अध्यापन सुरू होण्याआधीच.


आजकाल शिक्षकाची जबाबदारी केवळ शैक्षणिक राहिलेली नाही. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी ही शिक्षकांची असते. आजच्या शिक्षकावर प्रशासकीय कामाचे, मार्गदर्शन करणे, शिस्त लावणे, मूल्यमापन करणे, मार्केटिंग आणि मार्गदर्शकाचीही (मेन्टॉरिंग) जबाबदारी सोपवण्यात येते. मेन्टॉरिंग हा शिक्षकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा पैलू बनला आहे. विशेषतः मोठ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आवश्यक आहे.. विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी शिक्षकांना शाळेत पालकांप्रमाणे वागावे लागते.

प्रत्येक शिक्षकाला दररोज सरासरी २ ते ३ तास वाचणे आवश्यक असते. प्रत्येक शिक्षकाने स्वतःला सतत अपडेट करत राहावे लागते. प्रशिक्षण हा शिक्षकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्याचबरोबर  संस्था,  विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या मागणीनुसार  त्याला व्यवस्थापन आणि काम करावे लागते.

सध्याच्या परिस्थितीमुळे शिक्षकांनाही खूप संघर्ष करावा लागत आहे. शिक्षकांमध्ये प्रचंड अनिश्चितता आणि भीती आहे. या परिस्थितीला आपण यापूर्वी तोंड दिलेले नाही. आभासी अध्यापनाच्या जगामुळे शिक्षकांसमोर नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. सध्याच्या जगात शिक्षक टेक्नोसॅव्ही झाले आहेत आणि काळाच्या गरजेनुसार स्वतःला अद्ययावत करत आहेत. शिक्षकही एकमेकांना मदत करत आहेत आणि ते सगळ्या बाबतीत पूर्णपणे सहकार्य करत आहेत.

शिक्षक सरकारी समर्थित, अनुदानित/अनुदानित, अर्धसहाय्य, खाजगी/ स्वयंअर्थसहाय्य इत्यादी विविध प्रकारच्या संस्थांमध्ये काम करत असतात. ते ज्या प्रकारच्या संस्थेत काम करतात त्यावर शिक्षकांची मानसिकता अवलंबून असते. नोकरी आणि वेतनाची खात्री लक्षात घेता शिक्षकांच्या कामाच्या क्षमतेतही फरक असतो. तरीही अशा वातावरणात ही विविध  शाळा, महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावर नामवंत शिक्षकांचा विकास होत आहे. आपल्यापैकी अनेकजण शिकवण्याच्या नव्या आणि नावीन्यपूर्ण पद्धती विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.

शिक्षकांना वैयक्तिक जीवन, कुटुंब आणि काम सांभाळून एकत्र काम करावे लागते. अनेक व्यावसायिक जबाबदाऱ्या हाताळण्याबरोबरच शिक्षकाला स्वत:च्या आयुष्याचीही काळजी घेणे आवश्यक असते.


या सर्व संघर्षासह, या व्यवसायात आपणास बऱ्याच सकारात्मक बाबी सापडतील. पहिली बाब म्हणजे कामाचे तास, शिक्षकी पेशात वेळेबाबतीत बरीच लवचिकता असते. पण त्याच वेळी बौद्धिक कामाची मागणी असलेली नोकरी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये वैयक्तिक विकासासाला अधिक वाव आहे. तुम्ही कोणत्या ही आवडत्या प्रकारचे संशोधन करू शकता आणि ते करण्याच्या पद्धती तुम्ही ठरवू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कायमच शिकायला मिळतं. चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही लोकांमधील अधिक चैतन्यदायी भागाशी जोडलेले असता. अनंत ऊर्जा, कल्पनांचा प्रवाह आणि सतत वादविवाद ह्यासारख्या बाबींमुळे तुम्ही सदैव तरुण राहता.

हा व्यवसाय  खरंच इतकं सोपा आहे का? माझे बहुतेक शिक्षक मित्र या मथळ्याशी नक्कीच असहमत असतील.  शिक्षकांच्या आयुष्यात अडचणी येत असल्या तरी  आपल्यापैकी अनेकजण  अजूनही कामात सदैव आनंदी असतात.  .

त्यामुळे भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रसिद्ध उद्गार लक्षात ठेवा, "अध्यापन हा एका व्यक्तीच्या चारित्र्याला, क्षमतेला आणि भविष्याला आकार देणारा अतिशय उदात्त व्यवसाय आहे. जर लोकांनी मला एक चांगला शिक्षक म्हणून स्मरण केलं तर तो माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान ठरेल.'

अध्यापन व्यवसायात प्रवेश करण्यापूर्वी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे,  'तुम्हाला स्वतःच्या निवडीने की योगायोगाने शिक्षक बनायचे आहे?'

 

प्रा. अतुल फेगडे

 

To read this article in English click here: https://profatulfegade.wordpress.com/2020/09/05/teachers-job-is-very-simple/

Saturday, August 29, 2020

कामाच्या ठिकाणी टीका हाताळण्याचे 6 मार्ग



 कोणाला स्वतःबद्दलची टीका आवडते का? बरं, या जगात कोणालाही स्वतःवर केलेली टीका आवडत नाही. अनेकदा टीका हाताळणे कठीण असते. आपल्या घरात, ऑफिसमध्ये आणि समाजात आपल्या आजूबाजूला अनेक टीकाकार असतात. टीका ही एखाद्यातील चांगले-वाईट पैलूशोधण्यासाठीचा किंवा मूल्यमापन करण्याचा मार्गआहे. टीका ही लाजिरवाणी गोष्ट वाटू शकते. परंतु कामाची पद्धत सुधारण्याची ही एक संधी असू शकते.  टीका ही केवळ दोष शोधण्यासाठी नाही, तर ती एक चूक सुधारण्याची प्रक्रिया असू शकते. आपण जाणून घेऊ या, टीका वैयक्तिकरित्या कशी हाताळावी आणि त्यास कसे तोंड द्यावे?'

ॲरिस्टोटल -  टीका ही अशी गोष्ट आहे जी आपण काहीही न बोलता, काहीही न करता आणि काहीही नसण्याद्वारे सहजासहजी टाळू शकतो."



टीका हाताळण्याचे दोन सोपे मार्ग आहेत: एकतर कोणीही टीकेचा सकारात्मक पद्धतीने उपयोग करून सुधारणा करणे किंवा नकारात्मक पद्धतीने त्याचा सामना करणे, ज्यामुळे आत्मसन्मान ठेच पोहचून तणाव आणि क्रोध निर्माण होऊ शकतो. टीकेचे सर्वात सामान्य प्रकार  म्हणजे विधायक आणि विध्वंसक. एखाद्याची प्रतिष्ठा, नावलौकिक,  आणि स्वाभिमान नष्ट करण्याच्या हेतूने विध्वंसक टीका केली जाते. विधायक टीका म्हणजे तुमच्या चुका दाखवणे आणि तुम्ही कोठे सुधारणा करू शकता हे दाखवणे. कोणत्याही प्रकारची टीका असेल तरी, लक्षात ठेवा की त्याचा उपयोग अजूनही तुमच्या फायद्यासाठी होऊ शकतो.

जेव्हा तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात टीकेला सामोरे जाता तेव्हा खालील मुद्दे लक्षात ठेवा:

1. बचावात्मक पवित्रा घेणे टाळा:



जेव्हा आपण टीकेला सामोरे जातो तेव्हा अनेकांची पहिली प्रतिक्रिया म्हणजे बचावात्मक पवित्रा घेणे आणि आपल्या भूमिकेचे समर्थन करण्याचा प्रयत्न करणे. जे सांगितले जात आहे ते सक्रियपणे ऐका आणि ते समजून घ्या. अनेकदा लोक ऐकण्याऐवजी त्यांच्या टीकेच्या प्रतिसादा बद्दलचा किंवा द्यायच्या खुलाश्याचा विचार करत असतात. टीकाकारांचे हेतू प्रामाणिक आहेत असे गृहीत धरा. त्यांचे अभिप्राय मान्य करा आणि ते दिल्याबद्दल लोकांचे आभार माना. टीकेकडे खुल्या मनाने बघावे. सबबी देणे टाळावे.

2. टीका वैयक्तिकरित्या घेऊ नका


एक व्यक्ती म्हणून तुमच्यावर टीका केली जात नाही, तर ते तुमच्या कामाबद्दल किंवा कामाच्या पद्धतींबद्दल असते. त्यामुळे ताबडतोब निष्कर्ष काढू नका आणि ती वैयक्तिकरित्या घेऊ नका. कधीकधी टीका फक्त त्या व्यक्तीबद्दल नव्हे तर ती अभिमान आणि मत्सर यासारख्या भावनांबद्दल असते. तुमच्यावर टीका करणारी व्यक्ती जाणूनबुजून तुम्हाला खाली आणण्याचा किंवा तुम्हाला चिथावण्याचा प्रयत्न करत आहे असे गृहीत धरू नका. टीका ही परिस्थितीजन्य असते आणि तुमच्या कामाशी संबंधित असते, त्या व्यक्तीबद्दल नसते.

 3टीकेबद्दल चौकशी करा

अभिप्राय देणाऱ्या व्यक्तीच्या हेतूंकडे लक्ष द्या. अधिक चौकशी करा आणि त्याचा उद्देश जाणून घ्या. जर एखाद्यावर औचित्य साधून टीका केली जात असेल तर ते खोट्या टीकेचे लक्षण आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे उत्तम. अशा परिस्थितीत गप्प राहणे आणि आदरणीय गौरव प्रतिष्ठा टिकवून ठेवणे उत्तम. सुधारणेच्या उद्देशाने टीका असल्यास, गरज पडल्यास अधिक प्रश्न विचारा.

4)      4टीकेतून तुम्ही नवीन काय शिकू शकता ते जाणून घ्या


टीका नकारात्मक वाटत असली तरी यामुळे शिकण्याची आणि सुधारण्याची संधी मिळते. कल्पना करा, जर एखाद्याची सतत प्रशंसा होत असेल आणि त्याच्यावर कधीही टीका होत नसेल तर ती व्यक्ती कशी प्रगती करू शकते. त्यामुळे टीका हा आपल्या प्रगतीचा आणि विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. जर एखाद्याला खरोखरच जीवनात सुधारणा करायची असेल तर त्याने विधायक टीकेला आमंत्रण दिले पाहिजे आणि त्याचे कौतुक केले पाहिजे.

 5. ताबडतोब प्रतिक्रिया देणे टाळा


टीका हाताळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे थोडे थांबणे आणि मन शांत करणे. टीकेवर प्रक्रिया करण्यासाठी संयम आणि शांतता आवश्यक आहे. मनात राग आणि तीव्र प्रतिक्रिया येत असेल तर भूतकाळातही अशीच वेळ आली होती की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. या प्रकरणाच्या मूळ कारणाकडे जा. आंतरिक मनाशी प्रामाणिकपणे संवाद साधा ज्यामुळे आपण अजून नम्र आणि खंबीर बनतो.

6)      6हसत राहा


हसण्यामुळे अधिक आराम मिळतो. हसण्यामुळे सकारात्मक चैतन्य निर्माण होते आणि परिस्थितीत सामान्यता येते. हसण्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्यांचा दृष्टिकोन सोपा आणि मवाळ करण्याची प्रेरणा मिळेल.

टीका यशस्वीपणे हाताळण्याची गुरुकिल्ली म्हणजे टीकेचा हेतू ठरवणे, टीकेला शांतपणे प्रतिसाद देणे, त्याला विधायक पद्धतीने अवलंबणे आणि तुमचे नुकसान करण्यासाठी विनाकारण टीका करणाऱ्या लोकांपासून दूर राहणे.

प्रो. अतुल फेगडे

 

To read this article in English click here: https://profatulfegade.wordpress.com/2020/08/29/6-ways-of-handling-criticism-at-work/

 

 

References:

  1. Basu Sreeradha, 5 ways to deal with criticism at work, ET Bureau, 25/06/2019, https://economictimes.indiatimes.com/jobs/5-ways-to-to-deal-with-criticism-at-work/articleshow/69936292.cms accessed on 29/8/2020 at 4.47pm
  2. Castrillon Caroline, 5 Healthy ways to deal with criticism at work, 19/01/2019, https://www.forbes.com/sites/carolinecastrillon/2020/01/19/5-healthy-ways-to-deal-with-criticism-at-work/#bad2d36312a4 accessed on 29/8/2020, 4.30pm
  3. Greatist, How to handle criticism like a Pro, 11/6/2015, https://greatist.com/happiness/how-handle-criticism-pro#tl-dr, accessed on 29/8/2020 at 5.22pm
  4. Pettinger Tejvan, 7 effective ways to deal with criticism, https://www.lifehack.org/articles/featured/7-effective-ways-to-deal-with-criticism.html accessed on 29/8/2020, at 4.45pm
  5. Stahl Ashley, Five ways to bounce back from criticism at work, 30/05/2016, https://www.forbes.com/sites/ashleystahl/2016/05/30/five-ways-to-bounce-back-from-criticism-at-work/#66e5b858be12 accessed on 29/8/2020 at 5.10pm